महाबळेश्वर, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : प्रतापगड किल्ले प्रतापगडावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावनिमित्त प्रतापगडाचे मुख्य आकर्षण असलेल्या ध्वज बुरुजवर १५ फुटी बाय १० फुटांचा भला मोठा राष्ट्रध्वज लावण्यात आला आहे. वाडा कुंभरोशी ग्रामपंचायत आणि राजमुद्रा प्रतिष्ठाण पोलादपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा राष्ट्रध्वज लावण्यात आला आहे.
किल्ले प्रतापगडला साहसी किल्ला म्हणून ओळखले जाते. या किल्ल्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जोडला आहे. प्रतापगड हा किल्ला मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि भारतातील वीर योध्दा छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६५६ मध्ये बांधला. प्रतापगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहादुरीचा आणि त्यांनी केलेल्या पराक्रमांचा साक्षीदार आहे. हा किल्ला समुद्र सपाटी पासून १००० मीटर उंच बांधलाय. किल्ल्याची उंची ३५५६ फूट इतकी आहे. १६५६ ते १८१८ मधील काही महिने वगळता हा किल्ला कोणीही जिंकू शकला नाही. तर हा किल्ला शत्रू पासून अभेद्य आणि अजिंक्य राहिला. याच किल्ले प्रतापगडावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वज बुरुजवर मला मोठा राष्ट्रध्वज लावण्यात आला. यावेळीमहाबळेश्वर तालुक्याच्या तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी राजमुद्रा प्रतिष्ठान पोलादपूर चे सदस्य तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे उपस्थित होते.
पाऊसाचा प्रचंड जोर, वेगाने वाहणारा वारा याची कुठलीही तमा न बाळगता बुरुजावर मोठा ध्वज फडवण्याची ग्रामस्थांची प्रबळ इच्छा व महिला तहसीलदार यांची सकाळची उपस्थिती यामुळे ध्वजारोहणाचे वेगळेच आकर्षक निर्माण झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांनी केले व संकल्पना चंद्रकांत उतेकर यांची होती या कार्यक्रमासाठी पर्यटकांसह ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला वनव्यवस्थापन समिती चे अध्यक्ष विलास मोरे, आनंद उतेकर, विलास जाधव ग्रामसेवक चिटकूळ, बबन कासुर्डे, सर्कल खटावकर उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.