दिवसभरात 15 पॉझिटिव्ह, 24 कोरोनामुक्त

एका बाधित महिलेचा मृत्यू; 81 जणांचे नमुने निगेटिव्ह

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात आज दिवसभरात 15 जण पॉझिटिव्ह आढळून आले तर विविध रुग्णालयांतून 24 जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतले. 15 पॉझिटिव्ह वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 718 झाली असून कोरोनामुक्तांची एकूण संख्या 472 झाली आहे. 215 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान, एका बाधित महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 31 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

बाधित रुग्णांचा गावनिहाय तपशील पुढीलप्रमाणे

महाबळेश्वर : माचुतर येथील 30 वर्षीय महिला, फलटण : वडले येथील 24 वर्षीय पुरुष,कराड : तुळसण 50 व 22 वर्षीय महिला,35 वर्षीय पुरुष, सातारा : गोजेगाव येथील 74 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 23 वर्षीय महिला व 5 वर्षांची मुलगी,सैदापूर येथील 23 वर्षीय पुरुष, खिंडवाडी येथील 44 वर्षीय महिला,कोरेगाव : साप येथील 39 वर्षीय पुरुष, जावली :धोंडेवाडी येथील 51 वर्षीय महिला व 25 वर्षीय पुरुष,खटाव : राजाचे कुर्ले येथील 53 वर्षीय पुरुष, वाई : वेळे येथील 50 वर्षीय पुरुष.

कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू


साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालयात आज सकाळी शिरवळ (ता. खंडाळा) येथील 72 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तिला श्वसनाचा त्रास होत होता, अशी माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

104 जणांचे नमुने अहवाल निगेटिव्ह

एनसीसीएस (पुणे) कडून 81 तर कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) कडून 23 अशा एकूण 104 जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात आणखी 24 जण कोरोनामुक्त

कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथे दाखल असणारे 7, सह्याद्री हॉस्पिटल (कराड) येथील 9, खावली कोरोना केअर सेंटर येथील 6, वाई कोरोना केअर सेंटर येथील 2 अशा एकूण 24 जणांना आज दहा दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

कोरोनामुक्तांचा गावनिहाय तपशील पुढीलप्रमाणे

पाटण : नवसरवाडी येथील अनुक्रमे 60, 22 वर्षीय व 25 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, ताम्हिणे येथील 25 वर्षीय पुरुष, कालेवाडी येथील 21 वर्षीय महिला,खंडाळा : शिरवळ येथील 30 वर्षीय पुरुष,कराड : विंग येथील 19 युवक, 43 वर्षीय महिला, वानवाडी येथील 9 मुलगा, 19 वर्षीय युवक, 7 वर्षीय मुलगा व 70 वर्षीय महिला, खटाव : अंभेरी येथील 29 वर्षीय पुरुष, 44 वर्षीय महिला, 5 वर्षांची मुलगी, डांभेवाडी येथील 46 वर्षीय पुरुष, सातारा : कुसब्रुद्रुक येथील 19 वर्षीय युवक व 23 वर्षीय महिला, फलटण : सस्तेवाडी येथील 21 व 64 वर्षीय महिला
कोरेगाव : वाघोली येथील 57 वर्षीय महिला,यांसह वाई कोरोना केंअर सेंटर येथे दाखल असणाऱ्या 45 वर्षीय पुरुष व 15 वर्षांच्या मुलीचा यांत समावेश आहे.


105 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना

सातारा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 29, पानमळेवाडी येथील 1, शिरवळ येथील 19, कराड येथील 6, वाई येथील 17, कोरेगाव येथील 2, मायणी येथील 13, दहिवडी येथील 5, महाबळेश्वर येथील 13 अशा एकूण 105 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय व एनसीसीएस (पुणे)
यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
error: Content is protected !!