सातारा लोकसभेसाठी १६ उमेदवार रिंगणात; पाच जणांची माघार

उदयनराजे, शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०२४ अंतर्गत सातारा लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाकरिता आता सोळा उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे.दरम्यान या निवडणूकीत थेट लढत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विरूध्द महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यातच होणार आहे.

शनिवारी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. यावेळी छाननीमध्ये तीन उमेदवारी अर्ज अवैध ठरले. त्यामुळे २१ उमेदवारांचे अर्ज निवडणुकीसाठी पात्र ठरले होते.यापैकी शनिवारी विठ्ठल सखाराम कदम(अपक्ष) यांनी अर्ज माघार घेतला होता.तर आज सोमवारी दादासाहेब वसंतराव ओव्हाळ (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)), दिलीप हरिभाऊ बर्गे (भारतीय जवान किसान पार्टी),सागर शरद भिसे (अपक्ष) आणि चंद्रकांत जानू कांबळे (अपक्ष) या चार जणांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले.अशा एकुण पाच उमेदवारांनी आजच्या अंतिम दिवसाअखेर अर्ज माघारी घेतले आहेत. दरम्यान माघारी प्रक्रियेनंतर सर्व उमेदवारांना निवडणुक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

उमेदवार आणि त्यांना मिळालेले चिन्ह खालीलप्रमाणे -:

१) आनंद रमेश थोरवडे(बहुजन समाज पार्टी) चिन्ह – हत्ती

२) श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहमहाराज भोसले (भारतीय जनता पार्टी) चिन्ह – कमळ

३) शशिकांत जयवंतराव शिंदे(नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्ष. चिन्ह – तुतारी वाजवणारा माणूस

४) प्रशांत रघुनाथ कदम (वंचित बहुजन आघाडी) चिन्ह – प्रेशर कुकर

५) तुषार विजय मोतलिंग (बहुजन मुक्ति पार्टी) चिन्ह – खाट

६) सयाजी गणपत वाघमारे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) चिन्ह – शिट्टी

७) डॉ. अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले (अपक्ष) चिन्ह – कपाट

८) सुरेशराव दिनकर कोरडे (अपक्ष) चिन्ह – ऑटो रिक्षा

९) संजय कोंडीबा गाडे (अपक्ष) चिन्ह – तुतारी

१०) निवृत्ती केरु शिंदे (अपक्ष) चिन्ह – चालण्याची काठी

११) प्रतिभा शेलार (अपक्ष) चिन्ह – गॅस सिलेंडर

१२) सदाशिव साहेबराव बागल (अपक्ष) चिन्ह – दूरदर्शन

१३) मारुती धोंडीराम जानकर (अपक्ष) चिन्ह – हिरा

१४) विश्वजीत पाटील-उंडाळकर (अपक्ष) चिन्ह – बॅट

१५) सचिन सुभाष महाजन (अपक्ष) चिन्ह – फुगा

१६) सीमा सुनिल पोतदार (अपक्ष) चिन्ह – बॅटरी टॉर्च

अशा प्रकारे वरील १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

दरम्यान, एका ईव्हीएम मशीनवर १५ उमेदवार व एक नोटा असे १६ नावांची मर्यादा असल्याने फक्त नोटा या पर्यायासाठी दुसरी ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर वाढली आहे.त्यामुळं प्रत्येक मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम मशीन लागणार आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाने मायक्रो प्लॅन करुन चोख तयारी केेली असून ७ मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.

error: Content is protected !!