सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कृष्णानगर, खेड परिसरात राहणाऱ्या निवृत्त अधिकाऱ्याने घरगुती भांडणामध्ये १८ वर्षीय नातीला शिवीगाळ करीत पिस्तुल रोखल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयीत आरोपी रमेश ससाणे (वय ६५) याच्यावर सातारा शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णानगर येथे राहणाऱ्या रमेश ससाणे यांनी दि. २९ रोजी सायंकाळी मद्यपान करुन १८ वर्षीय युवतीवर पिस्तुल रोखली. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केला. या घटनेचा व्हिडीओ १८ वर्षीय युवतीने आपल्या मोबाईलमध्ये केला असून त्या आधारे सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
You must be logged in to post a comment.