सातारा पोलिसांनी पकडला 20 लाखांचा गुटखा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कर्नाटकातून गुटखा घेऊन पिकअप गाडी पुण्याकडे निघाल्याची माहिती मिळताच सातारा स्थानिक गुन्हे शाखेने सापळा लावून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने गाडी वेगाने पुढे नेली. पोलीसांनी पाठलाग करून पकडली नी थरारक पाठलागानंतर गाडी अडवून 20 लाखांचा गुटखा आणि वाहन, असा 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी प्रशांत देवराव आयकर वय 21, रा.जवळा ता.जामखेड जि.अहमदनगर यास अटक करण्यात आली आहे.

कर्नाटकमधून गुटखा घेऊन पिकअप गाडी पुण्याकडे निघाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सापळा लावला. संशयास्पद गाडी आल्यानंतर पोलीसांनी पाठलाग करून पकडली नी गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने गाडी भरधाव नेली. त्यामुळे पोलीसांनी पाठलाग करून पकडली नी पाठलाग करून खावली ता. सातारा हद्दीत ही गाडी अडवली. गाडीची तपासणी केली असता गाडीत 20 लाखांचा गुटखा सापडला. पोलीसांनी गुटखा आणि पिकअप गाडी, असा 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

error: Content is protected !!