खंडाळयासाठी दोनशे बेडचे सुसज्ज हॉस्पीटल उभारणार – मकरंद पाटील

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खंडाळा तालुकावासीयांसाठी खंडाळ्यातील इंडस्ट्रीने अत्याधुनिक कोरोना हॉस्पीटल उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. दोन दिवसात जागा निश्चित करावी अशी सूचना आमदार मकरंद पाटील यांनी खंडाळा येथे कंपनी प्रशासनाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत दिली . सर्व कंपन्यांच्य वतीने यास एकमुखी होकार दिल्याने खंडाळा तालुक्यासाठी सुसज्ज कोवीड हॉस्पीटल उभे राहणार आहे.
      

यावेळी आमदार मकरंद पाटील,  जि.प. अध्यक्ष उदय कबुले, सभापती राजेंद्र तांबे,  रमेश धायगुडे, तहसिलदार दशरथ काळे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, तालुका वैदयकिय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. रविंद्र कोरडे, पो . नि. महेश इंगळे, उमेश हजारे व सर्व कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.   

खंडाळा तालुक्यात कंपन्यांनी स्वतंत्र कोविड हॉस्पीटल उभारावे अशी मागणी खंडाळा तालुक्यातून होत होती . यासाठी  खंडाळ्यातील राजकीय व्यक्तींनी ही मागणी लावून धरली होती.यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात खा . उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जि .प. अध्यक्ष उदय कबुले, नितीन भरगुडे  व कंपनीचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. त्यानंतर खंडाळ्यात सर्व कंपनीचे प्रतिनिधी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत हॉस्पीटल उभारणीचा निर्णय झाला .
 

यावेळी बोलताना आ . मकरंद पाटील म्हणाले, संपुर्ण जग कोरोना महामारीचा सामना करीत आहे. कोरोनाने जगभर कहर केला आहे . लाखो लोकांचा मृत्यु झाला  असून अनेकांना आप्तजनांना मुकावे लागले. लोकांनी  सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने शहरासह ग्रामीण विभागाला विळखा घट्ट होऊ लागला आहे. वाई ,खंडाळा तालुक्यात बाधित रुग्णवाढ संख्या अधिक गतीने वाढत आहे .जिल्हयात प्रतीदिन दोन ते अडीच  हजार रुग्ण बाधीत होत आहेत. मृत्युदर वाढतोय, रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. कोविड कालावधीत जनतेला आधार मिळावा म्हणुन सुसज्ज रुग्णालय उभारणे गरजेचे आहे. शासनाने निर्माण केलेली रुग्णालय कमी पडत आहेत. खंडाळा तालुकावासीयांसाठी सर्व सुविधा युक्त रुग्णालय उभारण्यासाठी कंपन्यानी पुढाकार घ्यावा. यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल. ग्रामीण रुग्णालयात आयसीयु युनिट उभारणे गरजेचे आहे. त्याचा उपयोग रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी  होणार आहे. एशियन पेंटस कंपनीने खंडाळा ग्रामीण रुग्णालयात आयसीयू बेड देण्याचे जाहीर केले .

error: Content is protected !!