सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा आणि जावली तालुक्यात प्रत्येक गाव, वाडी, वस्ती डांबरी रस्त्याने जोडून विकासात्मक जाळे विणणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून सातारा तालुक्यातील तीन रस्त्यांचे रुंदीकरण व सुधारणा करणे आणि दोन पुलांचे बांधकाम करणे या कामांसाठी २५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार जुलै २०२३ च्या अर्थसंकल्पात या पाच कामांचा समावेश करण्यात आला आहे. लिंबखिंड ते खिंडवाडी रस्ता प्रजिमा ३० कि.मी. १/१०० ते ६/०० भाग रामनगर ते मोळाचा ओढा या रस्त्याचे रुंदीकरण आणि सुधारणा करण्यासाठी ९ कोटी ६० लाख, भोंदवडे, अंबवडे बु., सायळी, वडगांव, सावली, कुरुलबाजी, कुडेघर, रोहोट, पाटेघर, आलवडी, धावली रस्ता प्रजिमा १४३ कि.मी. ७/०० ते २०/०० भाग आष्टे ते पाटेघर या रस्त्याचे रुंदीकरण आणि सुधारणा करण्यासाठी ७ कोटी ६० लाख, राज्य महामार्ग ४ ते म्हसवे, करंजे, मोळाचा ओढा शाहूपुरी पोलीस ठाणे, मतकर कॉलनी ते शाहूपुरी चौक ते जुना मेढा रस्ता ते सारखळ प्रजिमा ११८ कि.मी. ५/५०० ते ७/०० भाग मोळाचा ओढा ते शाहूपुरी चौक या रस्त्याचे रुंदीकरण आणि सुधारणा करण्यासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
राज्य महामार्ग ४ ते म्हसवे, करंजे, मोळाचा ओढा शाहूपुरी पोलीस ठाणे, मतकर कॉलनी ते शाहूपुरी चौक ते जुना मेढा रस्ता ते सारखळ प्रजिमा ११८कि.मी. ७/७०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी ४० लाख आणि प्रजिमा २९ ते पोगरवाडी आरे दरे, रेवंडे वावदरे, राजापुरी ते प्रजिमा २९ रस्ता प्रजिमा १४० कि.मी. ३/१५० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी ४० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया व इतर सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करून सदर कामे वेळेत पूर्ण करा आणि कामे दर्जेदार करा अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
You must be logged in to post a comment.