सहा नगरपंचायतीतील २६६ उमेदवारांचे नशीब मतदान पेटीत बंद

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यातील लोणंद, खंडाळा, पाटण, कोरेगाव, दहिवडी, वडूज या नगरपंचयातींच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. 266 उमेदवारांचे नशीब मतदानपेटीत बंद झाले.

दि. 8 डिसेंबरपासून नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्यानंतर अर्ज छाननी व माघारीच्या प्रक्रियेनंतर 266 उमेदवार रिंगणात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने 24 प्रभागांतील जागा खुल्या झाल्या असून यांचा निवडणूक कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर झाला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत 17 पैकी 13 प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सोमवारी रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर उमेदवारांच्या होम टू होम घरभेटींचे सत्र सुरू झाले.सोमवारी सायंकाळी निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे.

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर मंगळवार, दि. 21 रोजी नगरपंचायतींसाठी मतदान झाले. सहा नगरपंचायतींसाठी 113 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान झाले. नगरपंचायतींसाठी 266 उमेदवार रिंगणात होते. आज या उमेदवारांचे नशीब पेटीबंद झाले. मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर नगरपंचायत कार्यक्षेत्रात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

error: Content is protected !!