सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): पिंपरी चिंचवड येथे मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन १९ आणि २० नोव्हेंबर रोजी होत आहे. या अधिवेशनासाठी सातारा जिल्ह्यातून ३०० पेक्षा जास्त पत्रकार उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे यांनी दिली.
साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर मराठी पत्रकार परिषदेच्या नियोजनाबाबत राज्य उपाध्यक्ष शरद काटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष दीपक प्रभावळकर,प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे,पत्रकार हल्लविरोधी कृती समितीचे सदस्य सुजित आंबेकर , डिजिटल मीडियाचे अध्यक्ष संतोष शिंदे उपस्थित होते.
राज्य उपाध्यक्ष शरद काटकर म्हणाले, राष्ट्रीय अधिवेशनासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या अधिवेशनात पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार असल्याने सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे.
जिल्हाध्यक्ष हरीष पाटणे म्हणाले, मराठी पत्रकार परिषदेचे मार्गदर्शक एस. एम. देशमुख यांनी पत्रकारांना ताकद दिली आहे. पत्रकारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आणि त्यांना अडचणीत मदत करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. प्रत्येकाच्या अडचणीत धावून जाण्याचा पत्रकार संघटनेचा प्रयत्न असतो. त्यामुळे सातारा जिल्ह्याची मराठी पत्रकार परिषदेमागे असणारी ताकद या अधिवेशनाच्या माध्यमातून दाखवून देण्यात येणार आहे.
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दीपक शिंदे म्हणाले, या अधिवेशनामध्ये पत्रकारांच्या प्रश्नांसोबतच पत्रकारितेतील नवीन बदल, संसाधने, समाज माध्यमे यांसह विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. पत्रकारितेतील नवीन माध्यमे आणि आव्हाने त्याबरोबरच नवीन पिढी येताना त्यांच्यासमोरची आव्हाने या सर्वांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे नव्याने पत्रकारितेत येणाऱ्यांसाठीही हे अधिवेशन मार्गदर्शक ठरणार आहे.
डिजिटल मिडियाचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले एस. एम. देशमुख यांच्या मार्गर्शनाखाली होणाऱ्या पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रीय अधिवेशनास आज झालेल्या बैठकीत राज्य उपाध्यक्ष शरद काटकर आणि जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार डिजिटल मीडियाच्या सर्व सदस्यांनी अधिवेशनास उपस्थित राहायचे आहे . या अधिवेशनात डिजिटल मीडियातील काम करणाऱ्या पत्रकार बंधूंना येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा होऊन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे हे अधिवेशन डिजिटल मीडियातील पत्रकारांसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.
या बैठकीस मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य चंद्रसेन जाधव डिजिटल मीडियाचे जिल्हा खजिनदार प्रशांत जगताप, संदीप शिंदे,विश्वास पवार,विनीत जवळकर,विठ्ठल हेंद्रे, डिजिटल मीडियाचे शहराध्यक्ष प्रतीक भद्रे,उपाध्यक्ष साई सावंत,सचिव गुरुनाथ जाधव,खजिनदार अमोल निकम,महेश पवार,प्रमोद इंगळे, रिजवान सय्यद,महेश क्षीरसागर, सचिन सापते, नंदकिशोर निपाणे, शुभम गुजर,तसेच साताऱ्यातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते
You must be logged in to post a comment.