सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यातील १६ शाळेतील तब्बल ३५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. लातूरच्या या शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने शाळा पुढील दहा दिवस बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य पथकांकडून बाधितांची मुलांची काळजी घेतली जात आहे.
साताऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. विविध शहरांत कोरोनाचे अधिकाधिक संख्येने रुग्ण मिळत आहेत. रुग्णांवर शहरातल्या विविध रुग्णांलयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर काही रुग्ण होम क्वारंटाईन आहेत.
शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढायला सुरुवात झाल्यापासून जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आहेत. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत आहे. जो नागरिक विनामास्क फिरेल त्याच्याकडून 100 रुपये दंड वसूल केला जात आहे तर तोच नागरिक दुसऱ्यांदा विनामास्क आढळला तर त्याच्याकडून 500 रुपये दंड घेतला जात आहे. नागरिकांनी नियम पाळावेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन नागरिकांनी करुन शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावं, असं सांगत सध्या तरी साताऱ्यात लॉकडाऊनचं कुठलंही प्रयोजन नाही मात्र नागरिकांनी नियम पाळले नाही तर कठोर पावलं उचलावी लागतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
You must be logged in to post a comment.