सातारा शहरात अयोध्या फाउंडेशनतर्फे ४० बेडचे आयसोलेशन सेंटर

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरात कोरोनाचा प्रसार वाढल्याने नगरसेवक विजयकुमार काटवटे यांच्या अयोध्या फाउंडेशनतर्फे ज्ञानगंगा विद्यामंदिर शाळा, मंगळवार पेठ, सातारा येथे ४० बेडचे आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे.

यासंदर्भातबोलतांना विजयकुमार काटवटे म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रमजी पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्या फाउंडेशन तर्फे मोफत ४० बेडचे सुसज्ज असे आयसोलेशन सेंटर व अन्नदान योजना ज्ञानगंगा विद्यामंदिर शाळा, मंगळवार पेठ, सातारा येथे सुरू करत आहोत.

अयोध्या फाउंडेशन सातारा ही संस्था गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम करीत आहे. सामाजिक भावनेची जाण ठेवून शासनाचे नियमास अनुसरुन कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आणणे करीता तसेच सर्वसामान्य जनतेची होत असलेली हेळसांड रोखणे करीता, तसेच रुग्णांची सेवा करणे करता हे सेंटर सुरू करत आहोत. तज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली, योग्य व सकस आहार, सुसज्ज बेड सर्व सोई सुविधांनी युक्त राहण्याची सोय असणार आहे.

अयोध्या फाउंडेशन आयसोलेशन सेंटर व आयोध्या अन्नधान्य योजनेला आपल्या अमूल्य अशा मदतीची गरज आहे. त्यामुळे सढळ हाताने कोणत्याही स्वरूपात मदत करावी, असे आवाहन अयोध्या फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक विजयकुमार काटवटे यांनी केले आहे.

error: Content is protected !!