कोरोनाचा प्रकोप काही थांबता थांबेना !

दिवसभरात 40 पॉझिटिव्ह, एकूण संख्या 689; कोरोनामुक्त 419
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालयांत अनुमानित म्हणून दाखल झालेल्या 40 जणांचे नमुने अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 689 इतकी झाली आहे. दरम्यान, आज (बुधवार) दिवसभरात 18 जण पूर्णपणे बरे होऊन आपापल्या घरी परतल्याने कोरोनामुक्तांची एकूण संख्या 419 इतकी झाली आहे. 
काल (मंगळवार) दिवसभरात एकही पॉझिटिव्ह आढळून आला नव्हता. मात्र लगेच दुसर्‍या दिवशी म्हणजे आज (बुधवार) 40 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोरोनाचा प्रकोप काही थांबता थांबेना.
पॉझिटिव्ह रुग्णांचा गावनिहाय तपशील : फलटण : तांबवे येथील 25 वर्षीय पुरुष, जावळी : ओझरे येथील 75 वर्षीय पुरुष,  भणंग 21 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय महिला, धोंडेवाडी 63, 57 वर्षीय पुरुष. महाबळेश्‍वर : 29 वर्षीय महिला. पाटण : जांभेकरवाडी 30 वर्षीय पूरुष, खंडाळा : आसवली 25 वर्षीय पुरुष. कराड : तुळसण येथील अनुक्रमे 26, 60, 51 वर्षीय पुरुष, 28 व 40 वर्षीय महिला, केसे येथील अनुक्रमे 50, 42, 64, 20 व 60 वर्षीय महिला, 20 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 42 वर्षीय महिला. वाई : वेरुळी येथील 46 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय मुलगा, 26 वर्षीय महिला, व्याजवाडी 29,27 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय महिला, पाचवड 39, 13,16 वर्षीय महिला, वेळे 59 वर्षीय पुरुष. सातारा : कुसवडे येथील 19 व 47 वर्षीय महिला, देगाव येथील 55 वर्षीय पुरुष, शाहुपुरी 58 वर्षीय पुरुष, पिंपळवाडी 18 वर्षीय महिला, 12 वर्षीय पुरुष. खटाव : गुरसाळे 39 वर्षीय महिला, मासुर्णे 24 वर्षीय पुरुष. माण : गोंदवले 63 वर्षीय महिला, असे दिवसभरात एकूण 40 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. 
आणखी 18 जण कोरोनामुक्त होऊन घरी
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज (बुधवारी) विविध रुग्णालयांतून एकूण 18 जण पूर्णपणे बरे होऊन आपापल्या घरी परतले. कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथून 8, कोराना केअर सेंटर (खावली) येथून 1, क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथील 2, कोरोना केअर सेंटर (फलटण) येथील 4, कोरोना केंअर सेंटर पार्ले (ता. कराड) मधील 1, सह्याद्री हॉस्पिटल (कराड) येथील 2 अशा एकूण 18 जणांना दहा दिवसांनंतर आज (बुधवार) डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) मधील  पाटण तालुक्यातील नंदगाव 67 वर्षीय पुरुष, कुंभारगाव 27 वर्षीय पुरुष, गलमेवाडी 24 वर्षीय महिला, गावडेवाडी  27 वर्षीय पुरुष, धामणी 31 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील दहिवडी 50 व 58 वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील दह्याट येथील 53 वर्षीय पुरुष. खावली केअर सेंटरमधील सातारा तालुक्यातील चाळकेवाडी 30 वर्षीय महिला. क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयातील 70 वर्षीय पुरुष व 8 वर्षीय मुलगा. फलटण कोरोना केअर सेंटर येथील 34 व 60 वर्षीय महिला, 9 वर्षांची दोन मुले. पार्ले कोरोना केंअर सेंटरमधील 1 महिला कराड सह्याद्री हॉस्पीटल येथील 21 वर्षीय पुरुष व 44 वर्षीय महिला. अशा एकूण 18 जणांना कोरोनामुक्त झाल्याने पुष्पगुच्छ देवून टाळ्यांच्या गजरात घरी सोडण्यात आले. 
आजपर्यंत जिल्ह्यात 689 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यापैकी 419 जण बरे झाले आहेत. तर 28 कोरोनामुळे जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 242 रुग्णांवर नियमानुसार उपचार सुरू आहेत.
 101 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथील 13, पानमळेवाडी येथील 1, शिरवळ येथील 17, कराड येथील 4, वाई येथील 7, रायगाव येथील 7, मायणी येथील 16, बेल एअर (पाचगणी) येथील 5, दहिवडी येथील 7, फलटण येथील 19 व कोरेगाव येथील 5 असे एकूण 101 जणांच्या घशातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 
दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी येथे मुंबईवरून प्रवास करुन आलेल्या 55 वर्षीय पुरुषाचा बेल एअर हॉस्पिटल (पाचगणी) येथे मृत्यू झाला आहे. या 55 वर्षीय अनुमानित पुरुषाचा मृत्यू पश्चात नमुनाही तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
180 जणांचे अहवाल निगेटिव्ह
एनएनसीएस (पुणे) आणि कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथे आज तपासणी करण्यात आलेल्या एकूण 180 जणांचा नमुने अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.






error: Content is protected !!