भुस्खलनग्रस्तांसाठी कोयनेत 150 खोल्या तयार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे २२ जुलैला कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या गावात भुस्खलन होऊन घरे गाडली गेली होती. या गावातील जनता गेल्या दोन महिन्यांपासून दाटीवाटीने कोयनानगर येथील माध्यमिक व प्राथमिक शाळेत राहत आहे. या आपत्तीग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी शासनाने कोयनानगर येथील १५० मोडकळीस आलेल्या खोल्या दोन महिन्यात नवीन केल्या आहेत. आता या खोल्यात येत्या दोन दिवसांत येथील ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन केले जाणार आहे.

कोयना प्रकल्पाच्या शासकीय वसाहतीतील १५० मोडक्या खोल्या दुरूस्त करून त्या खोल्यांमध्ये आपत्तीग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याच्या गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचनेवरून राज्य शासनाने तातडीने मान्यता देवून मोडकळीस आलेल्या खोल्या तातडीने नव्या स्वरूपात उभारण्याचे काम युध्द पातळीवर सुरु होते. दोन महिन्यांच्या कालावधीत सगळ्यांना हेवा वाटेल अशा सर्व सोयींनीयुक्त टुमदार १५० खोल्या कोयनानगर येथे तयार झाल्या आहेत. तब्बल दोन महिन्यानंतर आपत्तीग्रस्त व सध्या कोयनानगर व चाफेर-मिरगांव येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत राहणाऱ्या मिरगाव, ढोकावळे या गावातील आपत्तीग्रस्तांना येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.

शासनाने या आपत्तीग्रस्त लोकांच्या तात्पुरत्या निवासस्थानाचा विषय निकाली काढला आहे. कोयनानगर येथील १५० वसाहती मधील खोल्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. शासनाने या आपत्तीग्रस्त लोकांच्या तात्पुरत्या निवासस्थानाचा विषय निकाली काढला आहे. कोयनानगर येथील १५० वसाहती मधील खोल्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. दोन महिन्यात १५० खोल्या उभ्या राहिल्या आहेत. या खोल्यांमध्ये मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या आपत्तीग्रस्त गावातील बाधिताचे तात्पुरते पुनर्वसन केले जाणार आहे.

error: Content is protected !!