सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायती मधील राखीव २३ जागांसाठी मंगळवारी चुरशीने ८०.४९ टक्के इतके मतदान झाले. बुधवारी मतमोजणी केली जाणार आहे.
जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी या सहा नगरपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मागील महिन्यामध्ये ओबीसींसाठी राखीव असलेल्या जागा वगळून इतर सर्व जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील असलेले आरक्षण रद्दबातल केल्यानंतर राखीव ठेवलेल्या जागांवर निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीमध्ये राखीव ठेवलेल्या २३ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. याआधी झालेले मतदान आणि मंगळवारी झालेले मतदान यांची मतमोजणी बुधवारी दि. १९ रोजी त्या-त्या नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये केले जाणार आहे.
नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांनीस्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते. बुधवारी २३ जागांसाठी ९० उमेदवारांचे भवितव्य मतपेटी बंद झाले.
You must be logged in to post a comment.