सातारा (भूमीशिल्प वृत्तसेवा) : येत्या काही दिवसांत ७५ टक्के काँग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणणार असल्याचे आ. जयकुमार गोरे यांनी सांगितले.
भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार गोरे व प्रदेश सचिवपदी विक्रम पावसकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल भाजप जिल्हा कार्यकारिणी व खासदार रणजितसिंह नाईक-निबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी श्री. गोरे बोलत होते. पिंपरी चिंचवड प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे, भरत पाटील, दत्ता थोरात, सुवर्णा पाटील, सुरभी भोसले, रामकृष्ण वेताळ, सुनील काटकर, अविनाश फरांदे आदी उपस्थित होते.
गोरे म्हणाले, जिल्हाध्यक्ष झाल्याने पक्ष वाढविण्याची जबाबदारी माझ्यासह आपल्या सर्वांवर असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. जिल्हाध्यक्ष झाल्याने पक्ष वाढविण्याची जबाबदारी माझ्यासह आपल्या सर्वांवर असल्याचे सांगत येत्या काही दिवसांत ७५ टक्के काँग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणणार असल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले.
You must be logged in to post a comment.