पाटणमध्ये अल्पवयीन मुलीवर आठ जणांकडून बलात्कार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पाटण येथील अल्पवयीन व गतीमंद मुलीला बाहेर फिरायला आणि खायला देण्याच्या बहाण्याने नेत बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी ९ आरोपींना १२ तासात अटक करण्यात आली आहे.

पाटण येथील एका महिलेने दि. २७ जानेवारी ते दि. १८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत तिच्या परिचयाच्या एका अल्पवयीन व मतिमंद मुलीचा गैरफायदा घेवून तिला बाहेर फिरायला नेण्याचे, बाहेर खाऊ खायला देण्याचे व पैसे देण्याचे अमिष दाखवून घराबाहेर घेऊन जात तिची पाटण व आजूबाजूच्या परिसरातील लोकांशी ओळख करून दिली व तिला शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानुसार पाटण व आजूबाजूच्या परिसरातील आठ लोकांनी सदर अल्पवयीन मतिमंद पीडित मुलीवर वेळोवेळी व वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला आहे.

error: Content is protected !!