सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंतची सर्वात मोठी अशी ४१ टक्के पगारवाढ देत संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, संप मिठवण्यास कामगारांनी नकार दिल्याने आज एसटी प्रशासनाकडून कामावर रुजू व्हा अन्यथा एसटी आगाराच्या बाहेर आंदोलन करा अशा सूचना दिल्या. दरम्यान ९९ कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
एसटी कामदार पगारवाढीच्या घोषनेनंतरही आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. आमची विलिनीकरण हीच प्रमुख मागणी असून जोपर्यंत एसटी महामंडळाचे विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत आमचा संप आम्ही सुरूच ठेवू असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पगारवाढ म्हणजे निव्वळ फसवणूक असून विलिनीकरण केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नसल्याचे कर्मचारी सांगत आहे.
दरम्यान ९९ कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संप करण्यासाठी सहकाऱ्यांना प्रवृत्त करणाऱ्या आणि स्वतः संपात अग्रेसर राहून महामंडळाचं आर्थिक नुकसान करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
You must be logged in to post a comment.