किल्ले अजिंक्यताऱ्यावर सापडला ब्रिटिशकालीन खांब

सातारा (भूमीशिल्प वृत्तसेवा) :गेल्या काही दिवसांपूर्वी लागलेल्या वणव्यामध्ये किल्ले अजिंक्यतारा भक्षस्थानी पडला होता. त्यानंतर अजिंक्यतारा श्रमदान मित्र समुहाच्यावतीने संवर्धन मोहिम राबवत असताना ब्रिटीश कालीन खांब आढळून आला. त्या पिलरची पाहणी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी केली.

काही दिवसांपूर्वी संपूर्ण अजिंक्यतार्‍्याला वणवा लागला होता. तो वणवा गडावरही गेला होता. गडावरील गवत व काही झाडे जळली होती. श्रमदानाकरता गेलेले अजिक्यतारा श्रमदान ग्रुपचे जय कदम व करण पवार यांना किल्ला फिरत असताना पुरातन विहीरीच्या ठिकाणी दोन लोखंडी पुरातन पिलर आढळून आले. त्यांनी याची माहिती श्री. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा चे अभिरक्षक श्री प्रविण शिंदे यांना दिली. शिंदे यांनी प्रत्यक्ष जाग्यावरजावून पहाणी केली. हे पिलर साधारण 120 वर्षा पूर्वीचा ब्रिटिश कालीन असावेत व त्याचा वापर टेल लॅम्पलावण्याकरीता किंवा कंपाउंडचा पिलर म्हणून सुद्धा ब्रिटिश काळात केला जात असावा असा प्राथमिकअंदाज व्यक्त केला.

error: Content is protected !!