साताऱ्यातील शेतकऱ्याचा विधानभवनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मुंबई येथील विधानभवनाच्या बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. कांदळगावच्या एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. साताऱ्यातील कांदळगावचे शेतकरी सुभाष भानुदास देशमुख यांनी आज विधिमंडळ परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सुभाष देशमुख यांनी विधान भवनाबाहेर रॉकेल अंगावर टाकत स्वत:ला पेटवून घेतलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवत देशमुख यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.

विधिमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. अधिवेशनावेळी साताऱ्यातील कांदळगावचे शेतकरी सुभाष भानुदास देशमुख यांनी आज विधिमंडळ परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सुभाष देशमुख यांनी विधान भवनाबाहेर रॉकेल अंगावर टाकत स्वत:ला पेटवून घेतलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवत देशमुख यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. चौथा दिवस देखील अपेक्षेप्रमाणे वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाचे तीन दिवस विरोधकांच्या आंदोलनाने आणि घोषणाबाजीने चांगलेच गाजले. विरोधकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वेगवेगळ्या मागण्या केल्या. सध्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा गाजत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी आवाज उठवलाय. दुसरीकडे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जनतेतून सरपंच निवडीबाबतचे विधेयक मांडले. मात्र या विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध केला. यावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगल्याचे पहायला मिळाले.

error: Content is protected !!