सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : लग्नात नियमापेक्षा जास्त गर्दी जमवल्यामुळे शहरातील प्रमिला मंगल कार्यालयास सातारा नगरपालिकेकडून ३५ हजारांचा दंड करण्यात आला. लग्न समारंभात शासन निर्देशानुसार सामाजिक अंतर न राखणे व जास्त गर्दी यासाठी दंड वसूल करण्यात आला आहे.
सध्या सातारा जिल्हा आणि शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शासनाकडून कडक निर्बंध घातले असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन दक्ष आहे. साताऱ्यातील करंजे नाका परिसरातील प्रमिला मंगल कार्यालयात 50 व्यक्तीपेक्षा जास्त लोकं जमवून लग्न समारंभ सुरू असल्याचे नगरपालिकेचे कोरोना विभाग प्रमुख प्रणव पवार यांना समजले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यावेळी नियमाचे उल्लंघन झाल्याची खात्री करून संबंधित मंगल कार्यालय चालकांस 35 हजार रुपयांचा दंड केला.या कारवाईत नगरपालिकेस शाहुपुरी पोलिसांनी सहकार्य केले.
You must be logged in to post a comment.