मायणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मुलीचा मृत्यू ; एक जखमी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तेसवा) : मायणी ता. खटाव येथील मायणी पक्षी आश्रयस्थान परिसरात माॅर्निंग वाॅकसाठी गेेलेल्या मुलींना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर एक जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विद्या राजकुमार हिंगसे (वय १८, रा. मायणी, ता. खटाव) ही जागीच ठार झाली. तर तिच्या सोबत असणारी दिव्या काशिनाथ तोडकर (वय.१५, रा. मायणी) ही जखमी झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, मायणी, ता. खटाव येथील नवीपेठ , श्री. सद्गुरू सरुताई माऊली मठाच्या परिसरात राहणाऱ्या मुली  मॉर्निंग वॉकसाठी येथील पक्षी आश्रयस्थान परिसरामध्ये पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गेल्या होत्या. त्यावेळी पक्षी आश्रयस्थान परिसरात आल्यानंतर अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेमध्ये विद्या राजकुमार हिंगसे हिच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे ती जागीच ठार झाली. तर तिच्या सोबत असलेल्या इतर महिला व मुलींमधील दिव्या काशिनाथ तोडकर ही गंभीर जखमी झाली. तिला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

error: Content is protected !!