सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : उधारी दिलेले पैसे मागितल्याने चायनिज चालकाच्या डोक्यात बाटली फोडून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना साताऱ्यातील मोळाचा ओढा परिसरात घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अजय आणि इश्वर बापू मोरे (रा. गेंडामाळ, झोपडपट्टी, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंकरराव रामुहरी नायक (वय ४०, सध्या रा. रविवार पेठ, सातारा मूळ रा.ओरिसा) यांचा आयटीआयजवळील भिंतीच्या कडेला चायनिजचा गाडा आहे. या गाड्यावर मागील उधारीच्या कारणावरून संशयितांनी नायक यांना काही दिवसांपूर्वी शिवीगाळ व दमदाटी केली होती. दरम्यान, दि. ११ रोजी रात्री साठेआठच्या सुमारास वरील दोघे संशयित पुन्हा त्यांच्या गाड्याजवळ आले. दोघांनी ट्रीपल रार्इस मागितले. हे ट्रीपल रार्इस ते बनवत असताना र्इश्वर मोरे अचानक तेथे गेला. तुला मस्ती आली आहे का, तुला पैसे पाहिजेत का, असे म्हणून त्याच्या हातातील काचेची बाटली नायक यांच्या डोक्यात मारली. त्यामुळे काचेच्या बाटलीचे तुकडे नायक यांना लागले. यात ते गंभीर जखमी झाले. असे असतानाही गाड्यावरची सुरी घेऊन मोरे हा नायक यांच्या अंगावर जाऊन तुला आता कापतोच, अशी धमकी दिली. या प्रकारानंतर नायक यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात तक्रार दिली. सहायक फाैजदार निकम हे अधिक तपास करीत आहेत.
You must be logged in to post a comment.