सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी आज विधानसभेमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी महाराजांना शोभेल, असा नाही. त्यामुळे तेथे मेघडंबरीसह भव्य असा नवीन पुतळा उभारावा, अशी मागणी त्यांनी केली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज लक्षवेधीतून विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सदस्यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहेत. त्यांचा इतिहास फार मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय…म्हटलं की मराठी माणसाचे रक्त सळसळते, उर भरून येते.
तसेच अभिमानाने छाती फुलते. छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली. त्याप्रमाणे आपले राज्य चालले पाहिजे. पण, विधानभवनाच्या प्रांगणात जो छत्रपतींचा पुतळा आहे. त्याविषयी सदनातील प्रत्येकाची भावना आहे. हा पुतळा शिवाजी महाराजांना शोभेल, असा नाही. त्यामुळे येथे मेघडंबरीसह इतिहासाप्रमाणे तेथे नवीन भव्य पुतळा बसवावा. मी त्यांच्या घराण्यातील असून तसेच एक लोकप्रतिनिधी म्हणून मी माझी भावना मांडली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
You must be logged in to post a comment.