सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भुईंज येथील किसन वीर साखर कारखान्याला थकित एफआरपीसह इतर देणी तसेच कर्ज पुनर्वसनासाठी मदत मिळावी यासाठी कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जाऊन आज दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
किसन वीर साखर कारखान्याची निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून विद्यमान अध्यक्ष मदन भोसले यांचे पॅनेल रिंगणात आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे पॅनेल आहे. निवडणूक लागल्यापासून मदन भोसले विरोधकांना एक एक धक्का देत असून सभासदांना आपलेसे करण्यासाठीचे प्रयत्न सातत्याने करत आहेत.
कारखाना आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्याचे त्यांचे प्रयत्न निवडणुकीच्या रिंगणात राहूनच सुरू आहेत. त्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे.यासंदर्भातील एनसीडीसीचा त्यांनी शहा यांच्याकडे दिला. या प्रस्तावाची तत्काळ छाननी करून उचित कार्यवाही करण्याचे आदेश मंत्री शहा यांनी दिले आहेत.
You must be logged in to post a comment.