सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : देश भरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. साताऱ्यातील हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये 76 स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या या अमृतोत्सवानिमित्त शाळेमध्ये प्रचंड उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून आले. कोरोना महामारीमुळे 2 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेतून आणि दुःखद परिस्थितीतून सावरल्यानंतर विद्यार्थी मोठ्या आनंदाने कार्यक्रमात सहभागी झाले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे मान्यवर एनसीसीचे प्रशासकीय अधिकारी कॅप्टन मोहन भालसिंग, प्राची पवार, श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, सचिव नानासाहेब कुलकर्णी, मुख्याध्यापक प्रकाश नरहरी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांघिक कसरतीचे प्रात्यक्षिकही दाखवले. एकात्मतेचा संदेश देणारे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरणही केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण शाळेचे प्रांगण झेंडे, फुगे, रांगोळी इत्यादींच्या साहाय्याने अतिशय सुंदर सजवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
You must be logged in to post a comment.