सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) लोणंद येथील व्यापाऱ्याला पुणे येथील येरवडा कारगृहातील कुख्यात गुंड परवेझ हनिफ शेख याने येरवडा कारागृहातून पत्र पाठवून ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शेख याच्याविरूद्ध लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
लोणंद येथील कुमार गॅस एजन्सीचे अमित घनश्याम तापडिया (वय ३७, रा. लोणंद, ता. खंडाळा) यांच्या नावाने मंगळवारी (ता. २०) दुपारी चार वाजता पुणे- येरवडा येथील मंडल तुरूंगाधिकारी मध्यवर्ती कारागृहातून स्पीड पोष्टाद्वारे पत्र आले होते. तापडिया यांनी पत्र फोडून वाचल्यावर ते चंदन सेवानी यांच्या हत्याकांडामध्ये येरवडा कारागृहात कारावासात असलेल्या कुख्यात गुंड परवेझ शेख याने पाठवले असल्याचे निष्पन्न झाले.
त्या पत्राद्वारे गुंड परवेझ याने लोणंद येथील मल्हारी भंडलकर यांच्या मालकीची २७ एकर जमिनीचा (गट नंबर ४१४, एकूण किंमत ३० कोटी रूपये) अनाधिकृत व्यवहार सुरळीत करण्यासाठी ५० लाख रुपये खंडणीची मागणी परवेझ शेख याने तापडिया यांच्याकडे केली आहे. त्यानुसार तापडिया यांनी तातडीने लोणंद पोलिस ठाण्यात जाऊन गुंड परवेझ याच्याविरूद्ध खंडणीची फिर्याद दाखल केली आहे. लोणंद पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक गणेश माने तपास करत आहेत.
You must be logged in to post a comment.