सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरात नग्न अवस्थेत मानसिक रुग्ण असलेल्या युवकाने 2 तास धिंगाणा घातला. मनोरुग्णाने पोलिसांच्या गाडीची काच लाथ मारून फोडली.
साताऱ्यातील वाय.सी कॉलेज परिसरात मानसिक रुग्ण असलेल्या एका युवकाने 2 तास नग्नावस्थेत रस्त्यावर धिंगाणा घातला. कॉलेज रोड ते पोवई नाक्यापर्यंत नग्न अवस्थेत हा मनोरुग्ण चालत आला. यावेळी पोवई नाक्यावर मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती.
सातारा शहर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन गाडीमधून रुग्णालयात दाखल केले..दरम्यान या युवकाने पोलीसांच्या गाडीची मागची काच लाथा मारून फोडली. जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरदेखील नग्न अवस्थेत या युवकाने धिंगाणा घातल्याने मोठी गर्दी जमा झाली होती.
अखेर पोलिसांनी आणि सामाजिक कार्यकर्ते बबलू सोलंकी यांनी त्याला धरून शासकीय रुग्णालयात दाखल केले. मनोरुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले असून हा युवक स्वतःचे नाव सयाजी चव्हाण असल्याचे सांगत असून उंब्रज येथील माजगावचा राहणार असल्याचे सांगत आहे
You must be logged in to post a comment.