आकडा वाढतोय, चिंता वाढवतोय…!

आणखी 7 जणांना बाधा; तिघांचा मृत्यू, 11 जण परतले घरी
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 7 जण पॉझिटिव्ह आढळून आले तर विविध रुग्णालयांतून 11 जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतले. 7 पॉझिटिव्ह वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता  773 झाली असून कोरोनामुक्तांची एकूण संख्या 573 झाली आहे. दरम्यान, तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या आता 38 झाली आहे.160 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
मृत्यू पश्चात तिघांसह 7 जण पॉझिटिव्ह
एनसीसीएस (पुणे) येथे तपासणी करण्यात आलेल्या 7 नागरिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यापैकी तिघांचे नमुने मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 
4 बाधितांचा तालुकनिहाय तपशील पुढीलप्रमाणे  : कोरेगाव : चोरगेवाडी येथील 27 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, सातारा येथील 14 वर्षांची मुलगी, सातारा : पिंपळवाडी येथील 56 वर्षीय महिला, वाई : सह्याद्री नगर येथील 9 वर्षांची मुलगी.
 मृत्यू पश्चात 3 बाधितांचा तपशील पुढीलप्रमाणे 
पाटण तालुक्यातील गोवारे येथील 14 जून रोजी मुंबई येथून आलेला 50 वर्षीय पुरुष गावच्या शाळेतील अलगीकरणात कक्षात असताना 16 जून रोजी अचानक मृत्यू पावला होता. हावळेवाडी (बहुले) येथे 14 जून रोजी 45 वर्षीय महिला मानखुर्द (मुंबई) येथून आली होती. ती घरातच मृत्यू पावली होती. जावली येथील शिंदेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष 12 जून रोजी मुंबईवरून आला होता.16 जून रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे हॉस्पिटलला आणत असताना त्याचा रस्त्यात मृत्यू झाला होता. या तिघांचाही मृत्यू पश्चात नमुना पॉझिटिव्ह आला आहे. 
एकाच्या मृत्यू पश्चात नमुन्यासह 
185 नमुने तपासणीसाठी रवाना 

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथील 11(या अकरा नमुन्यांत जावली तालुक्यातील शिंदेवाडी येथील 43 वर्षीय पुरुषाच्या मृत्यू पश्चात नमुन्याचाही समावेश आहे), कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथील 37, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय (कराड) येथील 6, उपजिल्हा रुग्णालय (फलटण) येथील 3, ग्रामीण रुग्णालय (कोरेगाव) येथील 13, ग्रामीण रुग्णालय (वाई) येथील 7, शिरवळ येथील 19, रायगाव येथील 34, मायणी येथील 21, महाबळेश्वर येथील 10, दहिवडी येथील 24 अशा एकूण 185 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनसीसीएस (पुणे) आणि कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
150 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह 
एनसीसीएस (पुणे) यांच्याकडे व कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 150 जणांचे नमुने अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आणखी 11 जण कोरोनामुक्त
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथील 2, मायणी मेडिकल कॉलेज येथील 2, बेल एअर हॉस्पिटल (पाचगणी) येथील 2 व कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथील 2 व ग्रामीण रुग्णालय (कोरेगाव) येथील 3 अशा एकूण 11 जणांना दहा दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे
फलटण : जोरेगाव येथील 40 वर्षीय पुरुष, जावली : कावडी येथील 52 वर्षीय महिला, खंडाळा : शिरवळ येथील 55 वर्षीय महिला, अर्बन सिटी धनगरवाडी 50 वर्षीय महिला, कराड : केसे येथील 32 वर्षीय महिला, कर्वेनगर येथील 71 वर्षीय पुरुष व 62 वर्षीय महिला, कोरेगाव : पिंपोडे दिघेवाडी येथील 47 वर्षीय महिला गीघेवाडी येथील 48 व 25 वर्षीय पुरुष व 21 वर्षीय महिला, अशा एकूण 11 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले.




error: Content is protected !!