सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा) :बिग बॉस फेम अभिनेते आणि कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले हे आज सोमवारी वारकरी वेशात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.
कोरोनाचा देशभरात प्रादुर्भाव सुरू असल्यामुळे पिढ्यानपिढ्या सुरू असलेल्या अनेक परंपरा खंडित पडल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी या वारीला दरवर्षी पायी चालत लाखो वारकरी पंढरपूरला जात असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने गेल्या दोन वर्षापासून पंढरपूरच्या वारीवर निर्बंध आणले आहेत. मात्र , साताऱ्याचे बिग बॉस फेम अभिजित बिचुकले हे विठ्ठलाचे भक्त असल्याने यावर्षी विठ्ठलाच्या दर्शनाला ते पंढरपूरला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिक म्हणून अभिजीत बिचुकले यांना पुजेसाठी सोबत घ्यावं, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. आज सोमवारी अभिजीत बिचुकले चार चाकी वाहनानं पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.
You must be logged in to post a comment.