सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी विजय थोरात यांची नियुक्ती

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत बदली झाली आहे. त्यांच्या जागी भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डाॅ. विजयकुमार थोरात सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी यांची नियुक्ती झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने काढलेल्या आदेशानुसार अभिजित बापट यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत उपायुक्त पदावर पदोन्नती झाली आहे. तर सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार आहे. याबाबत उत्सुकता लागू राहिली होती. दरम्यान, आज भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डाॅ. विजयकुमार थोरात सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी यांची नियुक्ती झाली आहे. लवकरच ते पदभार स्विकारणार आहेत.

error: Content is protected !!