टाऊन प्लॅनिंगचा क्लार्क लाचलुचपतच्या जाळ्यात

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मोजणी नकाशात अतिक्रमण केलेल्या व्यक्तीचे नोंद प्रकरण घेऊन ते मंजूर करण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारल्याने साताºयातील नगर भूमापनमधील प्रमुख लिपिक शामराव बांदलला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोजणी नकाशात अतिक्रमण केलेल्या व्यक्तीची नोंद प्रकरण घेऊन ते मंजूर करण्यात येणार होते. यासाठी सातारा नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील प्रमुख लिपिक शामराव शंकर बांदल (वय ५२, रा. रामकुंड, सातारा. मूळ रा. बिभवी, ता. जावळी) याने पाच हजारांची मागणी करुन रक्कम स्वीकारली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक सचिन राऊत, हवालदार राजे, काटकर, येवले, भोसले आदींनी सापळा रचला होता.

error: Content is protected !!