मसूरचा तलाठी अन् सहाय्यक लाच घेताना जाळ्यात

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातबारा उतारे व सर्च रिपोर्ट देण्यासाठी मसूर, ता. कराड येथील तलाठी निलेश सुरेश प्रभुणे (४५, रा. मलकापूर, ता. कराड) व सहाय्यक रवीकिरण अशोक वाघमारे (२७, मसूर) या दोघांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांच्या अजोबांचे मसूर येथील जमिनीचे सातबारा उतारे व सर्च रिपोर्ट मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. याबद्दल्यात तलाठी प्रभुणे यांनी २ हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार लाच लुचपत विभागाने सापळा रचून बुधवारी निलेश प्रभुणे व रविकिरण वाघमारे या दोघांना २ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

error: Content is protected !!