सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : जावळी तालुक्यातील मेरुलिंग घाटात आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ४०० फूट दरीत कर कोसळल्याने तीन जण जागीच ठार तर चार जखमी झाले आहेत. कारचालक शिवाजी जगन्नाथ साबळे (वय 40), लिलाबाई गणपत साबळे (55), आणि सागर सर्जेराव साबळे (32) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी रेशनिंग आणण्यासाठी इ्॒टीगा कारमधून 8 प्रवाशी प्रवास करत होते. दरम्यान, मेरुलिंग घाटात एका अवघड वळणावर कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य हाती घेत जखमींना बाहेर काढले. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, 4 जण जखमी आहेत. त्यांना मेढा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
You must be logged in to post a comment.