साताऱ्यात पुणे-बंगलोर महामार्गावर अपघातात एक जण ठार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :   पुणे – बेंगलोर  महामार्गावर सातारा शहर परिसरातील बॉम्बे रेस्टॉरंट ते अजंठा चौक येथे आयशर व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात डांगेघर, ता. जावली येथील एकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार दि. ७ सप्टेंबर २०२१ रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सातारा गावच्या हद्दीत असणाऱ्या पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट ते अजंठा चौक परिसरात आयशर व ट्रक यांच्यात अपघात झाला. यामध्ये अमित तानाजी सुर्वे, (वय ३९, रा. डांगेघर, ता. जावली) हे गंभीर जखमी झाले. 

अपघातानंतर त्यांना तात्काळ सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल  करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरु करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

error: Content is protected !!