सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर कराड येथील पंकज हॉटेलसमोर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोरोना बाधित रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या भरधाव जीपने टेंपोसह दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला.
शिवम उर्फ विशाल निवृती यादव (वय ३५, सध्या रा. मुंढे ता कराड) असे अपघातात ठार झालेल्याचे नावे आहे. तर जीप चालक गणेश सुरेश यलार ( वय ४० रा, काशिळ) व टेंपो चालक सुशिल संतोष गायकवाड ( रा. शेणोली) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नाव आहेत.
याबाबत माहिती अशी की, गणेश यलार हे बोलेरो जीप क्रमांक( एम एच ५० एल ०१८९) मधून काशिळ येथुन गंभीर रूग्ण घेऊन कराडमधील रूग्णालयात जात होते. महामार्गावरून येत असताना येथील पंकज हॉटेलसमोर आले असता लाकडे भरून कराडमध्ये जात असलेल्या छोटाहत्ती टेम्पो ( क्रमांक एम एच ११ ए जी ५१३८) ला जीपने पाठिमागून भरधाव वेगात धडक दिली. या धडकेत टेंपो महामार्गावरच पलटी झाला. नेमके त्याचवेळी कराडकडे निघालेल्या दुचाकी क्रमांक ( एम एच ५० पी ९६७६) ला दोन्हीही वाहनांची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वारासह तिघे गंभीर जखमी झाले. जखमिंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
You must be logged in to post a comment.