सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : बामणोली परिसरातील गावच्या यात्रेत करमणुकीचा कार्यक्रम उरकून परत साताराच्या दिशेने जात असताना टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला 5 कलावंत जखमी झाले आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील यात्रेदरम्यान तमाशा कार्यक्रम पाठवून कराडच्या दिशेने निघालेला तमाशा कलावंतांचा टेम्पो कास परिसरातील अंधारी, ता. जावली गावाच्या हद्दीत एस वळणावर पलटी झाला.
कास परिसरातील एस वळणावर कमल कराडकर तमाशा मंडळाचा टेम्पो बुधवारी रात्री अकराच्या सुमारास पलटी झाला या टेंपोत वीज कलावंत होते. या पैकी पाच कलावंत जखमी झाले आहेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
You must be logged in to post a comment.