सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे-बेंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाटात एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सोमवारी सायंकाळी चार वाजणेच्या सुमारास मासे वाहतूक करणाऱ्या जीपचा अपघात आला. ही जीप चाळीस फूट खोल दरीत गेली. सुदैवाने यातील चालक सुखरूप रित्या वाचला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघातग्रस्त जीपला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढून, वाहतूक सुरळीत करण्यात आली.