कंटेनर व कारच्या भीषण अपघातात पाचजण जखमी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खंडाळा तालुक्यातील तोंडल हद्दीमध्ये शिरवळ-लोणंद रस्त्यावर कंटेनर व कारच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये कारमधील खेड-शिवापूर येथील प्रसिद्ध हॉटेल कैलास भेळच्या मालकांसह पाचजण जखमी झाले आहे.

शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खेड-शिवापूर येथील हॉटेल कैलास भेळचे मालक शिवराज शिवराज मिठारे हे कुटुंबियांसमवेत कार (एमएच १२ सिटी ३७९६)मधून नातेपुते याठिकाणी निघाले होते. कार शाम कुलकर्णी हे चालवीत होते. दरम्यान, कार हि तोंडल गावच्या हद्दीत एका हॉटेलसमोर असणाऱ्या एका रस्त्यावर आली असता विरुद्ध दिशेने येत असलेल्या कंटेनर (एमएच १४ एफटी ३६३६) ची व कारची जोरदार धडक झाली. 

या धडकेमध्ये कारमधील चालक शाम कुलकर्णी, सुभाष मिठारे, शिवराज मिठारे, महादेव लिमकर, शोभा मिठारे हे जखमी झाले. दरम्यान, अपघात एवढा भीषण होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबतची फिर्याद कारचालक शाम कुलकर्णी यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून कंटेनरचालक नितीन धर्मा सोलनकर (रा. जालिहळ ता. मंगळवेढा जि. सोलापूर ) याच्याविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दखल करण्यात आला आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस हवालदार अरुण भिसे-पाटणकर तपास करीत आहे.

error: Content is protected !!