सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) – ख्रिसमसची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. शनिवारी सकाळी सातारा-कास रस्त्यावर भरधाव कारचा अपघात झाला. यात चार पर्यटक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरूु आहेत.
पुण्याहून साताऱ्यात सकाळी चार पर्यटक गाडी (एमएच १२ एफीसी ३५१६) मधून कासच्या दिशेने जात होते. सकाळी थंडी आणि धुक्यामुळे समोरचा रस्ता दिसत नव्हता. त्यात कास चालकाला भरधाव वेगात समोर रस्ता न दिल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी पलटी झाली. या अपघातात गाडीमधील चार पर्यटक जखमी झाले. त्यांना तातडीने परिसरातील नागरिकांनी सातारा येथील रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
You must be logged in to post a comment.