सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कराड-रत्नागिरी रस्त्यावरील उंडाळे येथे पुलाचे बांधकाम सुरू आहे. रविवारी रात्री रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकास हे निदर्शनास न आल्याने पुलावरून पडून दुचाकी चालक व मागे बसलेल्या एकाचा मृत्यू झाला. जानू भैर झोरे व कोंडीबा भागोजी पाटणे (रा. भेंडवडी, ता. हातकणगले, जि. कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. तर दगडू भिरू झोरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
You must be logged in to post a comment.