सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान माण – खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटण येथे अपघात झाला. या अपघातात जयकुमार गोरे हे जखमी झालेले आहेत. अधिक उपचारासाठी त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि माण – खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा फलटण लोणंद रस्त्यावर अपघात झाला. फलटण शहरानजीक स्मशानभूमीजवळ बाणगंगा नदीवरील पुलावरून गाडी ५० फूट खाली कोसळून हा अपघात झाला. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे हे लोणंद कडून फलटणच्या दिशेने येत होते. यावेळी चालकाला पुलाचा अंदाज न आल्याने गाडी पुलावरून खाली कोसळली.
यामध्ये आमदार जयकुमार गोरेंसह त्यांचे स्वीय सहाय्यक, बॉडीगार्ड आणि चालक असे चौघेजण या अपघातात जखमी झाले आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना याबाबत आमदार जयकुमार गोरे यांनी जखमी अवस्थेत मोबाईल वरुन कळवताच पुढील चक्रे फिरुन जखमींना फलटण, बारामती आणि पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.
You must be logged in to post a comment.