सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झाला आहे. दरेकर यांच्या ताफ्यातील दोन गाड्या एकमेकांना धडकल्याने पारगाव खंडाळा येथे हा अपघात झाला. चालकाने वेळीच ब्रेक दाबल्याने प्रवीण दरेकर यांची गाडी मात्र सुरक्षित असल्याची माहिती आहे.
पुणे -बंगळुरू महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना वळणाच्या रस्त्यावर प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील एका गाडीने अचानक ब्रेक दाबल्याने मागील गाडी या गाडीवर जाऊन धडकली. दरेकर यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या या गाड्या होत्या. अपघातात दोन्ही गाड्यांचं किरकोळ नुकसान झालं आहे. अपघात झाल्यानंतर दरेकर हे स्वत:च्या गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी अपघातग्रस्त वाहनांमधील व्यक्तींची चौकशी केली.
या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर हे आपल्या नियोजित दौऱ्यासाठी कोल्हापूरकडे मार्गस्थ झाले आहेत.
You must be logged in to post a comment.