बाॅम्बे रेस्ट्राॅरंटनजीक भीषण अपघात; एक ठार, पाच जखमी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर बाॅम्बे रेस्टाॅरन्ट परिसरात शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भाजीचा ट्रक, कार आणि दुचाकी अशा तीन वाहनांचा अपघात झाला. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील चार प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत माहिती अशी की, महामार्गावर ट्रक (के ए 02 एम ए २२१५) कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जात होता. यावेळी ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक महामार्गावरून बॅरिकेट तोडून सेवा रस्त्यावर आला. ट्रकने कार (एमएच ११ पीजी २९१५) व दुचाकी (एमएच ११ बीएक्स ९४५९) यांना धडक दिली. याच दुचाकी चालक जागीच ठार झाला. तर कारला धडक बसल्याने कार शेजारील पत्र्याच्या शेडला धडकली. यात कारचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कारमधील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

error: Content is protected !!