महामार्गावर एसटी बसच्या समयसूचकतेमुळे अनर्थ टळला

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – पुणे बेंगलोर महामार्गावर सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सातारा येथील बाॅम्बे रेस्टाॅरन्ट उड्डाणपुलानजीक अपघात झाला. यात एसटी बस चालकाने दाखवलेल्या समयसूचकेतमुळे मोठा अनर्थ टळला.

याबाबत माहिती अशी की, कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जाणारी एसटी बस बाॅम्बे रेस्टाॅरन्ट उड्डाणपुलावरून खाली उतरत असताना सर्व्हिस रोडवरून एक महिला दुचाकी घेऊन महामार्गावर आली. एसटी बस पुलाच्या उताराला वेगात असल्याने अचानक दुचाकीमध्ये आल्याने एसटी बस चालकाने समयसूचकता दाखवून बसचा ब्रेक दाबून बस रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुचाकीला हलकीशी धडक बसली. तसेच बस संरक्षक जाळीला ठोकर मारली. या अपघातात बसचे नुकसान झाले. त्याचबरोबर दुचाकी चालक महिला किरकोळ जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

error: Content is protected !!