सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मुलाच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या आईचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना साताऱ्यातील कोडोली परिसरात घडली. आशा प्रकाश जाधव (वय ५५, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे दुचाकीवरून पडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आशा जाधव या त्यांचा मुलगा संजय याच्यासमवेत दुचाकीवरून साताऱ्यातून कोडोलीकडे शुक्रवार, दि. ४ रोजी जात होत्या. त्यावेळी कोडोलीतील अमरलक्ष्मी बस थांब्याजवळ असलेल्या स्पीडब्रेकरवर त्यांची दुचाकी जोरदार आदळली. यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या आशा जाधव या दुचाकीवरून खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला व हाता-पायाला गंभीर जखम झाली. त्यांना तातडीने साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सातारा शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद अद्याप झाली नव्हती.
You must be logged in to post a comment.