सातारा (भूमीशिल्प वृत्तसेवा) – सिक्कीम येथे रेस्क्यूसाठी जात असताना लष्कराच्या गाडीला अपघात झाला. गाडी दरीत कोसळल्याने जवान सुजीत किर्दत शहिद झाले. त्यांचे पार्थिक आज चिंचणेर, ता. सातारा येथील त्यांच्या मूळगावी आणण्यात आले होते. यावेळी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांना आश्रु अनावर झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा आर्यन किर्दत याने मुखाग्नी दिला.
सिक्कीम येथे रेसक्यू ऑपरेशन करण्यासाठी जात असताना सुजित किर्दत यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्यांचे अपघाती निधन झाले. सुजित किर्दत हे 106 बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. फुलांनी सजवलेल्या गाडीतून त्यांची अंत्ययात्रा गावातून शोकाकुल वातावरणात काढण्यात आली.
यानंतर किर्दत यांना पोलीस आणि सैन्यदलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या फैरी करत सलामी देण्यात आली. यावेळी जिल्हा सैनिक बोर्डाचे अधिकारी, सातारचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल,आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. यावेळी ग्रामस्थांनाही आश्रू अनावर झाले.
You must be logged in to post a comment.