एकनाथ शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर, देसाईंकडे राज्य उत्पादन शुल्क खातं

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील १८ मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर खातेवाटप लांबल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात होती. अखेर राज्य सरकारकडून खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शपथ घेतलेल्या १८ मंत्र्यांमध्ये खाती वाटण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांकडे १३ तर उपमुख्यमंत्र्यांकडे ८ खाती खातेवाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

इतर मंत्र्यांकडे देण्यात आलेली खाती पुढीलप्रमाणे…

राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित – आदिवासी विकास

गिरीष महाजन – ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे – बंदरे व खनिकर्म

संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे – कामगार

संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत – उद्योग

तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार – कृषी

दीपक केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे – सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा – पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

error: Content is protected !!