सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिरवळ येथील एसीजी ग्रुपच्या एसीजी केअर्स फौंडेशन मार्फत खंडाळा तालुक्यातील १८ गावांमध्ये ६००० हायजिन किटचे वाटप वाटप करण्यात आले.
या हायजिन किटमध्ये ४ मास्क्स आणि सॅनिटायझरच्या ५० मि. ली . च्या २ बॉटल्स प्रत्येक कुटुंबाला एक अशा प्रकारे देण्यात आल्या. सदरच्या हायजिन किटचे वाटप हे एसीजी केअर्स फौंडेशन आणि कोलंबस हेलथ केअर्स यांच्या माध्यमातून करण्यात आले. सदरचे वाटप हे एसीजी ग्रुपचे कुणाल व्यास, देवेंद्र पालकर , निधी पांडे , संदीप जाधव , अजित बाठे, किरण तसेच कोलंबस हेलथ केअर्सचे शिरीष गाढवे आणि इतर सहकार्यांमार्फत, ग्रामपंचायत, आशा वर्कर्स, आणि अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत करण्यात आले. परिसरातील ६००० कुटुंबांना याचा लाभ झाल्याचे कंपनी तर्फे सांगण्यात आले.
याचबरोबर कोरोना आणि राष्ट्रीय कोविड लसीकरण विषयी जनजागृती करण्यात आली. एसीजी केअर्स फौंडेशनच्या या सहकार्याचे परिसरातून आणि ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. चंद्रशेखर वाळके आणि अजय कुलकर्णी यांचे या कामी सहकार्य झाले.
You must be logged in to post a comment.