एसीजी केअर्स फौंडेशनतर्फे कोविड व्हॅनचे हस्तांतरण.

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : कोरोना रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर शिरवळ या ठिकाणी कोविड व्हॅन आणि दोन ड्रायव्हर्स यांची व्यवस्था एसीजी केअर्स फौंडेशनतर्फे करण्यात आली. कोविड व्हॅनचे हस्तांतरण डॉ. सतीशकुमार सरोदे, त्यांचे सहकारी, कोलंबस हेलथ केअरचे शिरीष गाढवे यांच्या उपस्थितीत एसीजी ग्रुपचे देवेंद्र पालकर आणि चेतन पानसरे यांच्या हस्ते हस्तांतरण करण्यात आले.

खंडाळा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आणि लोकांना सोयी सुविधा पुरविताना तालुका प्रशासनावर भार येत आहे. रुग्णांची ने -आण करण्याची अपुरी सोय असल्याची गरज ओळखूनकोविड व्हॅन ही तहसील कार्यालय खंडाळा कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड केअर सेंटर शिरवळ येथे काम करणार आहे. कोविड व्हॅन आणि दोन ड्रायव्हर्स यांची व्यवस्था एसीजी केअर्स फौंडेशनतर्फे करण्यात आली. सदर कोविड व्हॅन सुरु करणेकामी दशरथ काळे तहसीलदार, खंडाळा, एसीजी कंपनीचे श्री. योगेश कटारे आणि एसीजी केअर्स फौंडेशनचे चंद्रशेखर वाळके यांचे विशेष सहकार्य झाले. तालुक्यातील रुग्णांची वाढणारी संख्या आणि त्यांची होणारी गैर सोय लक्षात घेऊन फौंडेशनमार्फत सुरु करण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक तालुका प्रशासनामार्फत होत आहे.

error: Content is protected !!