सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :सातारा शहरातील थकबाकीदारांवर वसुली विभागाने कारवाई सत्र सुरू केले आहे. या अंतर्गत वसुली पथकाकडून शुक्रवारी सकाळी मंगळवार पेठेतील एका थकबाकीदाराचे नळ कनेक्शन तोडण्यात आले.
सातारा पालिकेला मालमत्ता व पाणीकरापोटी एकूण ६३ कोटी रुपये वसूल करावयाचे आहेत. यापैकी आजअखेर केवळ १२ कोटींचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. कारवाईची नोटीस बजावूनही थकबाकीदारांकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने वसुली विभागाने मालमत्ता सील करण्याची व नळकनेक्शन तोडण्याची कारवाई हाती घेतली आहे. बुधवारी दोघांचे नळकनेक्शन तोडल्यानंतर शुक्रवारी सकाळी ५१६, मंगळवार पेठ येथील जयवंत थोरात यांचे नळकनेक्शन तोडण्यात आले. त्यांच्याकडे घरपट्टी व पाणीपट्टीची एकूण १ लाख ८७ हजार ९७४ रुपये थकबाकी आहे.
या कारवाईत वसुली निरीक्षक प्रशांत खटावकर, अमोल आष्टेकर, सुदाम घाडगे, राजेंद्र शेळके यांनी सहभाग घेतला.
You must be logged in to post a comment.